कनिष्ठ न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या ५१३२ जागा रिक्त
Judges 5132 vacancies in Courts
Judges 5132 vacancies in Courts – देशातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या ५१३२ जागा रिक्त आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत दिली. केवळ कनिष्ठच नाही तर उच्च व सर्वोच्च न्यायालयातही न्यायाधीशांची काही पद रिक्त आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले!
कायदामंत्री किरण रिजिजू यांनी सांगितले की, सध्या सर्वोच्च न्यायालयात ८ न्यायमूर्तींच्या जागा रिकाम्या आहेत. पुढच्या २ महिन्यांत आणखी २ न्यायमूर्ती सेवानिवृत्त होतील. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींच्या २९ टक्के जागा रिकाम्या होतील. न्यायमूर्तींची शेवटची नियुक्ती २०१९ मध्ये करण्यात आली होती. १० जणांची नियुक्ती करण्यात आली होती.
तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
कनिष्ठ न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या ५१३२ जागा रिक्त (5132 vacancies for judges in lower courts) देशातील २५ उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या ४५४ जागा रिक्त आहेत. देशात न्यायाधीशांची स्वीकृत संख्या १०९८ आहे. सरकारी आकड्यांवरून ही भरती प्रक्रिया अत्यंत संथ गतीने झाल्याचे दिसते. यामुळे देशभरात अनेक खटले प्रलंबित आहेत.
सध्या देशातील सर्व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ६४४ आहे. यात ५६७ पुरूष तर ७७ महिला आहेत. कनिष्ठ न्यायालयांमध्ये तर ही परिस्थिती अत्यंत बिकट आहे. कनिष्ठ न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या ५१३२ जागा रिक्त आहेत.