रयत शिक्षण संस्थेत तब्बल 494 पदांची भरती सुरु, नवीन जाहिरात प्रकाशित! | 494 Vacancies at Rayat shikshan Sansthan!

Vacancies at Rayat shikshan Sansthan


 

Vacancies at Rayat shikshan Sansthan Recruitment- रयत संस्थेत नोकरी म्हणजे लाइफ सेट असे समीकरण समजले जाते, यातच सध्या साताऱ्याच्या नामांकित रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आणली आहे. संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 494 रिक्त पदे भरली जाणार असून पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. चला तर या भरती बद्दल पूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया सजून घेऊया!

पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी शुल्क फक्त 200 रुपये असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 मे 2025 आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना शिक्षण क्षेत्रात आपलं करिअर घडवायचं आहे, त्यांनी ही संधी हातचं जाऊ देऊ नये. सध्या ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु झाली असून आम्ही हि लिंक खाली रोजगारसंधीच्या या लेखात  दिलेली आहे.

या भरतीसाठी थेट मुलाखतींचं आयोजन – 14 मे रोजी
निवड प्रक्रियेत कोणतीही लेखी परीक्षा न ठेवता थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी 14 मे 2025 रोजी पुण्यातील तीन वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये मुलाखती घेतल्या जाणार आहेत. ही एक पारदर्शक व जलद भरती प्रक्रिया ठरणार आहे.

मुलाखतीचे ठिकाण – पुण्यातील तीन महत्त्वाची केंद्रं

उमेदवारांना त्यांच्या सोयीनुसार खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी उपस्थित राहता येणार आहे:

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंधगाव, पुणे
  • महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी, पुणे
  • एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर, पुणे

महाराष्ट्रभर नोकरीची संधी
या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रात कुठेही नेमणूक मिळू शकते. रयत शिक्षण संस्था राज्यभरातील ग्रामीण व शहरी भागात कार्यरत असल्याने उमेदवारांना विविध ठिकाणी शिक्षणाचा अनुभव घेता येणार आहे.

आवश्यक पात्रता आणि अधिक माहिती
या पदांसाठी UGC नियमानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवरून (https://rayatshikshan.edu/) सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे. याठिकाणी जाहिरात, पदांचा तपशील, पात्रता निकष आणि अर्ज करण्याची लिंक उपलब्ध आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी रयतची संधी
रयत शिक्षण संस्था ही राज्यातील सर्वात मोठ्या शिक्षणसंस्थांपैकी एक असून, हजारो शिक्षक व लाखो विद्यार्थी येथे कार्यरत आहेत. या संस्थेत काम करण्याची संधी मिळणे म्हणजे एक प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. त्यामुळे ही भरती तुमचं शैक्षणिक स्वप्न पूर्ण करणारी ठरू शकते!

शेवटी… ही संधी चुकवू नका!
शैक्षणिक क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. अर्ज करा, मुलाखतीला उपस्थित राहा आणि महाराष्ट्रातील प्रतिष्ठित संस्थेत सहाय्यक प्राध्यापक बनण्याचा मान मिळवा!
अधिक माहितीसाठी वेबसाईट भेट द्या – rayatshikshan.edu

2 Comments
  1. Trupti krushna mukane says

    Kbp collage pandharpur vacancy available?

  2. Anuja korde says

    Education kay paahije ya sathi

Leave A Reply

Your email address will not be published.