युनियन बँकेत विविध पदांची भरती;शिक्षण, निवड प्रक्रिया सर्वकाही जाणून घ्या!

union bank bharti 2025


 

Union Bank Bharti 2025

Union Bank Bharti 2025 – बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आलीय. युनियन बँकेमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार युनियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाइटवर पदभरतीची संख्या, पात्रता, निवड प्रक्रिया, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आलाय.

युनियन बँक भरतीद्वारे एकूण 500 पदे भरली जातील. यापैकी असिस्टंट मॅनेजर (Credit)ची 250 पदे आणि असिस्टंट मॅनेजर (IT)ची 250 पदे धरली जाणार आहेत.

कशी असेल निवड प्रक्रिया?
युनियन बँक भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा किंवा ग्रुप चर्चेच्या माध्यमातून होईल. यानंतर अर्जांची छाननी होईल. तसेच निवड प्रक्रियेत वैयक्तिक मुलाखतीचादेखील समावेश असू शकतो. निवडीसाठी या सर्व किंवा कोणत्याही पद्धती वापरायच्या की नाही? हे ठरवण्याचा अधिकार बँकेकडे राखीव असेल याची नोंद घ्या.

अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर होम पेजवरील संबंधित लिंकवर क्लिक करा. त्यानंतर उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करा. यानंतर उमेदवारांनी त्यांच्या अर्जावर पुढे जा. आता अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. यानंतर अर्ज शुल्क भरा. शेवटी पुष्टीकरण पेज डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याचे प्रिंटआउट ठेवा.

अर्ज शुल्क
एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून 177 शुल्क घेतले जाईल. इतर श्रेणीतील उमेदवारांकडून 1180 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. तुम्ही ही रक्कम डेबिट कार्ड (रुपे/व्हिसा/मास्टरकार्ड/मास्ट्रो), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस, कॅश कार्ड/मोबाइल वॉलेट्स/यूपीआयच्या माध्यमातून भरु शकता.

20 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज करावा. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास, दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

2 Comments
  1. Pratiksha shejwal says

    All good

  2. rohidas gajaba gore says

    punyat melel ka job

Leave A Reply

Your email address will not be published.