फक्त ४३६ रुपये भरा आणि दोन लाखांचा विमा मिळवा-प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरू!

Pradhan Mantri Jyoti Bima Yojana


Pradhan Mantri Jyoti Bima Yojana

मित्रांनो, होय, तुम्ही वाचलेले अगदी योग्य आहे. कर्त्या पुरुषाचा अचानक मृत्यू झाल्यास कुटुंब उघड्यावर पडते. अशावेळी आर्थिक साहाय्य गरजेचे असते. केंद्र सरकारने यासाठीच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरू केली आहे. यातून वारसांना दोन लाखांचा आर्थिक लाभ देण्यात येतो. Pradhan Mantri Jyoti Bima Yojana Details – चला तर याबद्दल आपण पूर्ण माहिती बघूया!

कोण पात्र ठरू शकतात?

  • ज्यांचे बैंक किंवा पोस्ट १ ऑफिसमध्ये खाते आहे.
  • वय १८ ते ५० वर्षांदरम्यान असलेली व्यक्ती विमा घेऊ शकते.
  • वयाच्या ५५व्या वर्षापर्यंत ३ विम्याचे नूतनीकरण करता येते.

 

अर्ज प्रक्रिया कशी कराल?

  • ऑनलाइन : आपल्या बँकेच्या नेटबँकिंग किंवा मोबाइल अॅपद्वारे अर्ज करू शकता.
  • ऑफलाइन : जवळच्या बँकेच्या २ शाखेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करता येतो.
  • ऑटो-डेबिट मंजुरी प्रीमियम दरवर्षी : आपोआप वसूल करण्यासाठी खातेदाराने मंजुरी द्यावी लागते.

जास्तीत जास्त लोकांनी विमा काढावा

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत जास्तीत जास्त खातेदारांनी सहभागी व्हावे आणि दरवर्षी नियमितपणे हप्ता भरावा. आपल्या पश्चात, वारसांना विम्याअंतर्गत रक्कम मिळते आणि त्यांना आर्थिक आधार प्राप्त होतो. या योजनेचा जोखीम कव्हर कालावधी १ जून ते ३१ मे या दरम्यान असतो.

 

बँक खात्यातून हप्ता जाईल – प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत वार्षिक हप्ता ४३६ रुपये दरवर्षी १५ ते ३१ मे दरम्यान तुमच्या बैंक खात्यातून वळता होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.