पुण्यात नोकरीची संधी, महानगरपालिकेत सरळ नवीन पदभरती सुरु, त्वरित करा अर्ज!


PMC Bharti 2025

आपण जर पुणे सारख्या शहरात नोकरीची शोधात असाल तर हि भरती जाहिरात आपल्या साठी एक उत्तम संधी बनू शकते. कारण या भरती साठी सरळ निवड प्रक्रिया आहे. आणि निवड पद्धती सुद्धा एकदम सोपी आहे. पुणे महानगरपालिका द्वारे एक नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. हि जाहिराती पालिकेने १३ मे २०२५ रोजी अधिकृत संकेत स्थळावर प्रकाशित केली आहे. याची PDF लिंक आम्ही खाली दिलीच आहे. या भरती अंतर्गत   “सिनिअर डेटाबेस इंजिनिअर, डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर पेमेंट सर्व्हिसेस, सॉफ्टवेअर इंजिनिअर असेसेमेंट सर्व्हिसेस, सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२), सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२), सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर, टॅक्स कम्पायलेशन व रिकंसीलेशन” इत्यादी पदांच्या 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने सरळ पत्यावर आहे. आणि हो,  अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2025 आहे. अर्ज समक्ष जाऊनच सादर करावा लागेल. चला तर या PMC भरती संदर्भातील अन्य माहिती बघूया. 

  • पदाचे नाव  सिनिअर डेटाबेस इंजिनिअर, डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर पेमेंट सर्व्हिसेस, सॉफ्टवेअर इंजिनिअर असेसेमेंट सर्व्हिसेस, सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२), सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२), सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर, टॅक्स कम्पायलेशन व रिकंसीलेशन
  • पदसंख्या13 Vacancies
  • शैक्षणिक पात्रता – विविध पदानुसार राहील, तरी अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • नोकरी ठिकाणPune – PMC Office
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन ऑफिस मध्ये अर्ज सादर करावेत.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्याल, पुणे महानगरपालिका.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in
तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

अर्ज संदर्भातील महत्वाच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या: 

  • सदर पदांची नेमणूक ही पूर्णतः कंत्राटी पध्दतीने असेल. या पदावरील अधिकारी / कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही.
  • कंत्राटी पध्दतीने भरावयाच्या पदांसाठी निवड मंडळ गठित करण्यात आले असून, शासन निर्णय क्र. प्रा नि मं१२४/प्र.क्र. (४३/१४)/१३-अ, दि. ०५.०६.२०१४ नुसार मधील तरतुदीनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.
    वरील पदांसाठी मा. महापालिका आयुक्त यांचे नावे असणारा, पुणे मनपाच्या www.pmc.gov.in या वेबसाईट वर असणारा छापील अर्ज Download करण्यात यावा. सदर चा अर्ज सुवाच्च अक्षरात संपूर्णपणे भरून मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालया मध्ये दि. १६/०५/२०२५ रोजी पर्यंत सकाळी १०.०० ते सांयकाळी ०५.०० या कार्यालयीन वेळेत (कार्यालयीन सुट्टया वगळून) समक्ष सादर करावा. पोस्टाद्वारे/ईमेल द्वारे प्राप्त होणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • सदर अर्जासोबत जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / शाळा सोडल्याचा दाखला / जन्मतारीख नमूद असलेल्या शालांत परिक्षाप्रमाणपत्र यांची साक्षांकित प्रत, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्र, अनुभव विषयक प्रमाणपत्रे, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र यांच्या साक्षांकित छायाप्रती सोबत जोडून, अर्जावर स्वतःचा एक पासपोर्ट साईज फोटो लावण्यात यावा.
  • अर्धवट भरलेला, अपुरी कागदपत्रे असणारा, चुकीची / विसंगत माहिती असणारा तसेच नमूद दिनांकानंतर प्राप्त होणारा अर्जप्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • वरील पदावरील नेमणूका दरमहा एकवट वेतनावर करारपद्धतीने व ६ महिने तात्पुरत्या कालावधीसाठी केल्या जातील. त्यानंतर करार संपुष्टात येईल.
  • विजा (अ), भज (ब), भज (क) व भज (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्धन झाल्यास अद्यावत प्रचलित शासनधोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गाच्या उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.
    उपरोक्त पदाकरीता ‘अ’ दर्जाच्या महापालिकेतील सेवेमध्ये किमान २ ते ३ वर्षाचा मिळकतकर (Property Tax) संगणक प्रणाली कामकाजाचा अनभव असल्यास प्राधान्य.

रिक्त पदांचा तपशील आणि अन्य महत्वाची माहिती 

Post Details PMC Bharti 2025

या PMC भरतीच्या महत्वाच्या लिंक्स 

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

PDF Application Form (अर्जाचा नमुना)

येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.