पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये शिक्षक पदांची भरती सुरु, सरळ नोकरीची संधी!
PCMC Shikshak Bharti 2025
आताच प्रकाशित नवीन जाहिराती नुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “शिक्षक” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मे २०२५ आहे. हि भरती शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टल द्वारे होत आहे. या संदर्भातील पूर्ण जाहिरात प्रकाशित झाली असून अर्ज सादर करण्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे. शैक्षणिक व आावसायिक अर्हता अध्यापनाचे विषय, वयोमर्यादा आरक्षण, अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह https://tait2022 mahatracherrecruitment.eu.in यावर पवित्र उमेदवारांठी सर्वसाधारण सूचना’ या शीर्षाखाली उपलब्ध आहेत. सदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करुनच ऑनलाईन अर्ज करावेत.
- पदाचे नाव – शिक्षक
- पदसंख्या – 09 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ मे २०२५
- अधिकृत वेबसाईट – pcmcindia.gov.in
- अर्ज करण्याची लिंक –https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/
महत्वाचे
- इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील. इ. 1 ली ते इ. 5 वी व 6 वी ते 8 वी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- 2022 (TAIT) परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील. डिसेंबर 2022 मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र TAIT परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील.
- इ. 6 वी ते इ. 8 वी या गटातील इतिहास/भूगोल/सामाजिक शास्त्र या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) सामाजिकशास्त्र विषय घेऊन TET-Paper-2/CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- इ. 6 वी ते इ. 8 वी या गटातील विज्ञान/गणित/गणित-विज्ञान या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान विषय घेऊन TET-Paper-2/CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- इ. 6 वी ते इ. 8 वी या गटातील भाषा या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान किंवा सामाजिकशास्त्र यांपैकी कोणताही विषय घेऊन TET-Paper-2/CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- इ.1 ली ते 8 वी/इ. 9 वी ते 12 वी अध्यापक विद्यालय या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- 2022 (TAIT) या चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे.
📑 PDF जाहिरात लिंक |
https://shorturl.at/78hih |
✅ अर्जाची लिंक |
https://tait2022.mahateacherrecruitment.org.in |
✅ अधिकृत वेबसाईट |
pcmcindia.gov.in |