अखेर पाटबंधारे विभाग भरतीची जाहिरात प्रकाशित, विविध पदांसाठी नोकरीची संधी! – Patbandhare Vibhag Bharti
Patbandhare Vibhag Bharti
Maharashtra Patbandhare Vibhag Bharti – जलसंपदा विभाग – WRD महाराष्ट्र (पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र) – अधीक्षक अभियंता, बीड सिंचन प्रकल्प मंडळाने नवीन पदभरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या नवीन जाहिरात मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. तसेस उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. हि जाहिरात अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी वैजनाथ या विभागीय कार्यालयाद्वारे प्रकाशीत करण्यात आली आहे. या भरतीची निवड प्रक्रिया सरळ मुलाखती द्वारे आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२५ आहे. अधिक माहिती खालील प्रमाणे आहे. तसेच अर्जदारांनी दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महाराष्ट्र शासन नि.क्र. संकिर्ण-2715/प्र.क्र. 100/13 दि. 17/12/2016 अन्वये या मंडळांतर्गत कार्यरत असलेल्या 4 विभागीय कार्यालयांतर्गत बीड / लातूर / परभणी जिल्ह्यातील विवक्षीत कामासाठी विहित अटी व शर्तीचे अधीन राहुन १ ११ महिन्याच्या कालावधीसाठी थेट मुलाखतीद्वारे करार पध्दतीने एकुण सात सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी-2/उप विभागीय अधिकारी / उप विभागीय अभियंता यांची नेमणुक करण्यात येणार आहे. त्याकरीता जलसंपदा विभागातून कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता /सहाय्यक अभियंता श्रेणी-2/उप विभागीय अधिकारी / उप विभागीय अभियंता या संवर्गीय सेवेमधुन सेवानिवृत्त झालेले स्थापत्य अभियंता यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. निवड झालेल्या सेवानिवृत्त अभियंत्यांना उपरोक्त नमुद दि.17/12/2016 च्या शासन निर्णयातील ड (1) (क) प्रमाणे व महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2715/प्र. क्र. 100 (भाग-1) / आस्था (का. 13) दि-23/09/2024 प्रमा मासीक पारिश्रमिक वेतन अनुज्ञेय राहील.
रिक्त पदांचा तपशील आणि अन्य माहिती
- पदाचे नाव – सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी-2/उप विभागीय अधिकारी / उप विभागीय अभियंता
- पदसंख्या – 07 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती –ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी वैजनाथ जि.बीड
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 मे 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2025
- अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/
निवृत्त कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता श्रेणी-२/उपविभागीय अधिकारी/उपविभागीय अभियंता या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.wrd.maharashtra.gov. या वेबसाइटवर ऑफलाइन सादर करण्याचे निर्देश आहेत. WRD महाराष्ट्र (जलसंपदा विभाग, महाराष्ट्र) भरती मंडळ, महाराष्ट्र यांनी मे २०२५ च्या जाहिरातीत एकूण ०७ रिक्त पदांची घोषणा केली आहे.अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १३ जून २०२५ आहे.
अर्ज करण्यास महत्वाचे नियम
सदर नेमणुकी करीता लागू असलेल्या अटी व शर्ती व अर्जाचा नमुना महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या ई-जलसेवा या वेबसाईटवर http://wrd.maharashtra.gov.in उपलब्ध आहे. तसेच हा अर्ज आणि अटी व शर्ती अधिक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी वैजनाथ या कार्यालयात उपलब्ध आहेत. उपरोक्त प्रमाणे करारावरील नेमणुकी करीता लागू असलेल्या अटी व शर्ती तसेच अर्जाचा नमुना सोबत दिलेला असून, इच्छूक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी वैजनाथ जि.बीड यांचेकडे दिनांक-13/06/2025 ला सायंकाळी 17.45 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा प्रत्यक्षरित्या सादर करावा. तसेच अर्जाचे पाकीटावर सेवानिवृत्त अधिकारी यांची करारावर नेमणुक करण्याबाबत असे स्पष्ट लिहिण्यात यावे. नियोजित कालावधीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. सदर नेमणुका समितीच्या मुलाखतीद्वारे करण्यात येतील. उपरोक्त नेमणुकांकरीता आलेले कोणतेही अर्ज किंवा सर्व अर्ज अस्विकृत करण्यांचे / रद्द करण्याचे तसेच संपूर्ण नेमणुक प्रक्रिया किंवा करण्यात आलेली नेमणुक रद्द करण्याचे सर्व अधिकार या मंडळाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.