ना परीक्षा, ना इंटरव्ह्यू; थेट मिळणार सरकारी नोकरी, NHAI मध्ये भरती सुरु!
NHAI Bharti 2025 Apply Now

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या नॅशनल ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये (NHAI Recruitment NHAI Bharti 2025 Apply Now) नोकरीची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंजिनियर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदासाठी ६० जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. परीक्षेशिवाय तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार आहे.
नॅशनल ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये ६० पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यात २७ पदे सामान्य प्रवर्गासाठी तर इतर पदे राखीव प्रवर्गासाठी आहेत. या नोकरीसाठी तुम्ही वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. तुम्हाला वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्जावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करुन फॉर्म जमा करायचा आहे. या फॉर्मचे प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिविल इंजिनियरिंगमध्ये बीई किंवा बीटेक डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत GATE २०२५ मध्ये चांगले गुण असणे गरजेचे आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड फक्त GATE २०२५ मध्ये मिळालेल्या स्कोअरच्या आधारे होणार आहे. या नोकरीसाठी ना कोणती परीक्षा ना कोणता इंटरव्ह्यू होणार नाही.
अर्जप्रक्रिया
या नोकरीसाठी अर्जपप्रक्रिया १० मे पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जून २०२५ आहे. इच्छुकांनी vacancy.nhai.org या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. सर्व कागदपत्रेदेखील अपलोड करा.

Age limit Kay aahe