खूषखबर! एसटी महामंडळात नोकरीची संधी; ३६७ पदांसाठी होणार भरती; अर्ज कसा करावा?
Nashik MSRTC Recruitment 2025
Nashik MSRTC Recruitment 2025 – Friends, there’s a golden opportunity for you to join the Maharashtra State Road Transport Corporation (Nashik MSRTC Recruitment 2025)! This is a fantastic job opportunity for 10th pass and ITI candidates. According to the information received, recruitment has been announced for the ST Mahamandal (MSRTC Nashik Bharti) in Nashik. Applications are being invited for a total of 367 trainee positions. The advertisement for these jobs has been published by the Divisional Controller, State Transport Corporation. To be eligible for these MSRTC positions, candidates must have passed ITI, an Engineering Degree, or a Diploma. You can apply for these jobs either online or offline. The training location for these trainee positions will be in Nashik.
मित्रांनो, MSRTC म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. १० वी पास, ITI उमेदवारांना हि नोकरीची मस्त संधी आहे. प्राप्त माहिती नुसार, एसटी महामंडळ, नाशिक येथे सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण ३६७ पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठीची जाहिरात विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. (MSRTC Recruitment) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातील या नोकरीसाठी ITI/ अभियांत्रिकी पदवीधर/ पदविकाधारक उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. प्रशिक्षणार्थी पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. प्रशिक्षणाचे ठिकाण नाशिक येथे असणार आहे.
तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
अभियांत्रिकी पदवीधर, मॅकेनिकस मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, मॅकेनिक अॅटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स,वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रीक), पेन्टर, मॅकेनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅकेनिक (रेफिजरेशन अँड एअर कंडिशनिंग),इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, कारपेंटर या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १४ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे.
या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२५ आहे. इच्छुकांनी सर्वात आधी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे.यानंतर तुम्हाला वेबसाइटवर अर्ज करायचा आहे. शिकाऊ उमेदवारांच्या निवडीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय, एन.डी.पटेल रोड,शिंगाडा तलाव नाशिक येथे तुम्हाला अर्ज नमुना मिळणार आहे. त्यानंतर तो भरुन सबमिट करायचा आहे.