महत्वाचे!-नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पगार ३ लाख रुपये महिना; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या!

Nabard Bharti 2025 jobs


सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. नाबार्ड म्हणजे नॅशनल बँक फॉर्म अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. नाबार्डमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Nabard Recruitment) नाबार्डमधील ही भरती ६ रिक्त पदांवर होणार आहे. वेगवेगळ्या विभागात ही भरती होणार आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. या नोकरीसाठीचे ठिकाण नाबार्डचे हेड ऑफिस मुंबई आहे. त्यामुळे तुम्ही मुंबईत राहत असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.

Nabard Bharti 2025 Update

तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

नाबार्डमधील स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी अर्जप्रक्रिया १६ मे २०२५ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जून २०२५ आहे.इच्छुकांनी नाबार्डच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. (Nabard Recruitment 2025)

In Charge–Survey Cell Nabard Bharti 2025 Jobs पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३८ ते ५५ वयोगटातील असावे. सिनियर स्टॅटिस्टिकल अॅनालिस्ट पदासाठी ३० ते ४५ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत. Statistical Analyst पदासाठी २४ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित क्षेत्रात मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १५० ते ८५० रुपये फी भरावी लागणार आहे.राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १५० रुपये फी भरावी लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. या नोकरीबाबत अधिक माहिती तुम्हाला वेबसाइटवर मिळेल. अर्ज करण्यापूर्वी ही माहिती नक्की वाचा. या नोकरीसाठी निवड झाल्यावर In Charge–Survey Cell पदासाठी ३ लाख रुपये महिना पगार मिळणार आहे. Senior Statistical Analyst पदासाठी २ लाख रुपये पगार मिळणार आहे. Statistical Analyst पदासाठी १.२५ लाख रुपये पगार मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.