मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने विविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे

Mumbai District Sports Club Free Summer Camp


Mumbai District Sports Club Free Summer Camp

उन्हाळा म्हणजे सुट्या असे एक समीकरण आहे. या सुट्यांमध्ये अनेक पालक आपल्या पाल्यांसाठी विविध उन्हाळी शिबीर शोधत असतात. यातच मुबई मध्ये अंक ठिकाणी अशे शिबीर आयोजित करण्यात येतात. सध्या, मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व विविध क्रीडा संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ एप्रिल ते ९ मे २०२५ या कालावधीत विविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या उपक्रमामध्ये हैंडबॉल, बास्केटबॉल, वुशू, पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग आणि फुटबॉल या खेळांचा समावेश आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगराच्या जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी केले आहे. हि शिबीर म्हणजे बच्चेकंपनीसाठी एक पर्वणीच आहे. चला तर माहिती करून घेऊया या फ्री समर कॅम्प (Mumbai Free Summer Camps For Kids 2025)बदल माहिती!!

तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

प्रशिक्षण स्थळे आणि वेळा पुढीलप्रमाणे :

  • बास्केटबॉल : जिकेपी बास्केटबॉल कोर्ट, आचार्य अत्रे मैदान, पंतनगर, घाटकोपर (पूर्व) येथे सायंकाळी ४.४५ ते ६.०० वा.
  • हँडबॉल : विभागीय क्रीडा संकुल, चिकूवाडी, मुंबई पब्लिक स्कूलसमोर, सायंकाळी ४ ते ६ वा.
  • फुटबॉल : होली पब्लिक स्कूल, अंधेरी येथे सायंकाळी ४ ते ६ वा.
  • पॉवरलिफ्टिंग व वेटलिफ्टिंग : फिटनेस पॉईंट जिम, भांडूप पश्चिम येथे दुपारी ३ ते ६ वा.
  • वुशू : श्री नारायण गुरु हायस्कूल, चेंबूर व एस.आय.इ.एस., घाटकोपर येथे दुपारी १२.३० ते १.३० वा.

 

शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर, भक्ती आंब्रे, क्रीडा कार्यकारी अधिकारी प्रीती टेमघरे व शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मनिषा गारगोटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी मनीषा गारगोटे – ८२०८३७२०३४, श्रीमती प्रीती टेमघरे – ९०२९०५०२६८ यांना संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.