पदवीधरांसाठी नोकरीची संधी! MPSC अंतर्गत पशुधन अधिकारी पदाच्या २७९५ पदांची मोठी भरती सुरु!
MPSC LDO Bharti 2025

पदवीधर उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘MPSC ‘कडून मोठी भरती जाहिरात समोर आली आहे ही भरती आतापर्यंतच्या MPSC आयोगाच्या इतिहासातील मोठ्या भरतींपैकी एक आहे. या भरतीमधून तब्बल २ हजार ७९५ जागा भरल्या जाणार आहेत. या सर्व जागा ‘गट अ’ च्या आहेत. चला तर मित्रांनो, आता आपण या भरतीबद्दल अर्ज प्रक्रिया, शुल्कभरणा, शैक्षणिक अर्हता आणि महत्त्वाच्या सूचना वाचा सविस्तर माहिती बघूया.
या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृषि,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडून MPSC आयोगाला प्राप्त झालेल्या मागणीपत्राच्या अनुसार पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या संवर्गातील पद भरती नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती मध्ये तब्बल 2,795 पदे भरली जात आहेत. हि जाहिरात म्हणजे पदवीधर उमेदवारांसाठी एक पर्वणीच आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ एप्रिल २०२५ पासून सुरु होत आहे. तसेच महत्वाचे म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२५ आहे.
MPSC LDO Bharti 2025 – So Friends, as per the requirement letter received by the MPSC Commission from the Department of Agriculture, Animal Husbandry, Dairy Development and Fisheries of the Government of Maharashtra, a new advertisement has been published. Under this new recruitment process for the post of Livestock Development Officer (MPSC LDO Recruitment 2025), Maharashtra Animal Husbandry Service, Group-A. As many as 2,795 posts are being filled in this recruitment. This advertisement is a great opportunity for graduate candidates. The online application process for this recruitment is starting from 29 April 2025. Also, it is important to note that the last date for applying is 19 May 2025.
- पदाचे नाव –पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा (Livestock Development Officer LDO)
- पदसंख्या – २७९५ पदे
- शैक्षणिक पात्रता – पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्रभर कोणत्याही जिल्ह्यात पोस्टिंग राहील
- अर्ज पद्धती – ऑनलाईन अर्ज MPSC पोर्टल द्वारे
- वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला वर्ग – रु. 394/-
- मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग – रु. 294 /-
- अर्ज सुरू होण्याची तारीख – २९ एप्रिल २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ मे २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
अर्ज करण्यास शैक्षणिक अर्हताः-MPSC Live Stock Development Officer educational criteria:
शैक्षणिक अर्हताः– Possess Bachelor’s Degree in Veternary Science or Veterinary Science and Animal Husbandry. (भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम, १९८४ च्या पहिल्या व दुसऱ्या अनुसूचीनुसार भारतीय विद्यापीठ किंवा पशुवैद्यकीय संस्था यांची मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय अर्हता.)
MPSC ADO अर्ज करण्याची पध्दत
तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
जर आपण या भरती साठी अर्ज करणार असाल तर माहिती कृष्ण घेऊया अर्ज सादर करण्याचे टप्पे. खालील स्टेप्स वरून आणि दिलेल्या लिंक वरून आपण आयोगाच्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
- स्टेप १. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पध्दतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करुन खाते (Profile under MPSC LDO Bharti 2025) तयार करणे.
- स्टेप २. खाते तयार केलेले असल्यास व ते अदययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे,
- स्टेप ३. विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.
- स्टेप ४. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
अर्ज सादर करण्यास आवश्यक कागदपत्र
या भरतीसाठी अर्ज सादर करण्यास खालील कागपत्र सादर करावे लागतील.
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
- सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा वैध पुरावा
- वैध नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचे प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID Card) किंवा वैश्विक ओळखपत्रासाठीचा नाव नोंदणी क्रमांक (Enrolment Number)
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
- अनाथ आरक्षणाकरीता पात्र असल्याचा पुरावा
- खेळाडू आरक्षणाकरीता पात्र असल्याचा पुरावा
- अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.घ., खेळाडू, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
- एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा (लागू असल्यास)
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
- राज्य शासकीय कर्मचारी यांच्याकरीता वयोमर्यादेतील सवलतीचा दावा असल्यास सादर करावयाचे प्रमाणपत्र
- राज्य पशुवैद्यक परिषद / भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा, १९८४ नुसार नोंदणी केलेल्या प्रमाणपत्राची प्रत
MPSC वेतनश्रेणी बद्दल माहिती
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा | Rs. 56,100/- to 1,77,500/- रुपये प्रति माह |
MPSC LDO भरती वेळापत्रक

MPSC भरती अर्ज करण्यासाठी लिंक्स | |
| 📑 पूर्ण PDF जाहिरात लिंक | https://shorturl.at/MLZxL |
| 👉 ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक | https://mpsconline.gov.in/candidate/login |
| ✅ अधिकृत वेबसाईट लिंक | Official Website |
