Maharashtra Police Bharti- १५ हजार पदांच्या पोलीस भरतीला मान्यता;गणेशोत्सवानंतर अर्ज प्रक्रिया सुरु होणार!
Maharashtra Police Bharti
Maharashtra Police Bharti 2025 – 2026 – The wait of thousands of youth in the state for the past several months has ended today. In an important meeting of the state cabinet held on Tuesday, a decision has been taken regarding the recruitment of as many as 15,000 police posts under Maharashtra Police Bharti 2025. The proposal for recruitment of 15,000 police officers has been approved in today’s cabinet meeting. This decision will speed up the recruitment process that has been stalled for several months, and the police force will get fresh manpower.
राज्याच्या गृह विभागात सध्या पोलिसांची १३ हजार ५६० पदे रिक्त असून, गणेशोत्सवानंतर पदभरतीला सुरवात होणार आहे. सध्या रिक्त पदांची बिंदुनामावली पडताळणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राज्याच्या ‘प्रशिक्षण व खास पथके’च्या अपर पोलिस महासंचालकांनी रिक्त पदांची माहिती गृह विभागाला कळविली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजण्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये पदभरतीला सुरवात होईल, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे. राज्यातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली पोलीस भरतीची प्रतिक्षा आज संपली आहे. आज मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत तब्बल १५ हजार पोलीस पदांच्या भरतीसंदर्भात निर्णय झाला आहे Maharashtra Police Bharti Starting Date. आजच्या कॅबिनेट बैठकीत १५ हजार पोलीस भरतीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक महिने थांबलेल्या भरती प्रक्रियेला वेग येणार असून, पोलिस दलाला ताज्या दमाचे मनुष्यबळ मिळणार आहे. चला या संदर्भात पूर्ण माहिती बघूया.

राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी सुरू होण्याची अपेक्षा होती, मात्र प्रशासकीय कारणांमुळे ती लांबणीवर गेली. यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच भरती जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती आहे. या भरतीद्वारे राज्यातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. ग्रामीण भागातील तसेच शहरातील हजारो उमेदवार पोलीस दलात सामील होण्यासाठी सज्ज आहेत. महायुती सरकारने राज्यातील सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी ही मोठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
आवश्यक कागदपत्रे – List of Documents for Maharashtra Police Bharti 2025 – 2026
- 10 वी, 12 वी गुणपत्रक व प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड सर्टीफिकेट / जन्म दाखला
- डोमासाईल (अधिवास प्रमाणपत्र)
- जातीचा दाखला / EWS प्रमाणपत्र
- नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रता कागदपत्रे (पदविका, पदवी) व इतर समकक्ष शैक्षणिक कागदपत्र / प्रमाणपत्र
- समांतर आरक्षण प्रमाणपत्र
- महाआयटी यांचेकडे ऑनलाईन सादर केलेला अर्ज व त्यासंबंधी सर्व मुळ कागदपत्रे
- मैदानी व लेखी चाचणी प्रवेशपत्र
- ०४ आयकार्ड साईज फोटो
- कोणतेही ०२ ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड इ.)
पोलिस दलात ताज्या आणि ऊर्जावान तरुणांचा समावेश झाल्याने कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा टप्प्यांचा समावेश असणार आहे. तसेच पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्याचा सरकारचा मानस आहे. महायुती सरकार आल्यानंतर पोलीस भरतीच्या तारखेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आजचा दिवस निर्णायक ठरला आहे.

Ex servicman chi proccejar Kay ahe
Army ex servicman details and procizar