त्वरित करा अर्ज! – महाराष्ट्र शिक्षक भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरू, २४ मेपासून परीक्षा होणार!

Maha TAIT Shikshak Bharti 2025


Maha TET Shikshak Bharti 2025

 

शिक्षक बनायचे स्वप्न असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे! Maha TAIT

Shikshak Bharti 2025 शिक्षक भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) २४ मे ते ६ जून या कालावधीत होणार आहे. या परीक्षेसाठी २६ एप्रिल ते १० मे या कालावधीत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली. ता परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झालीय. अर्ज करण्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे. 

‘IBPS ‘ या संस्थेच्या माध्यमातून https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/ या लिंक द्वारे अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेतली जाणार आहे. ही परीक्षा उमेदवारांना मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमातून देता येणार आहे. २०० गुणांच्या या परीक्षेत १२० गुण अभियोग्यता, तर ८० गुण बुद्धिमत्तेसाठी असतील. या परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांतील भरतीसाठी ग्राह्य धरले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात नावाची नोंद करताना ती आधार कार्डमधील नोंदीप्रमाणे असणे आवश्यक आहे. परीक्षेच्या वेळी, निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दाखवणे अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्जातील नावात आणि आधारकार्डवरील नावाच्या नोंदीत कोणतीही तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. अर्ज सादर करताना उमेदवाराने तीन परीक्षा केंद्रांची निवड करणे अनिवार्य आहे. उमेदवारांना अधिक माहिती http://www.mscepune.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे. तसेच नळ अर्ज करण्याची लिंक https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/ आहे.

MSCE पुणे परीक्षा परिषदेने २०१८ आणि २०१९ मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांनी या यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती अर्जात भरावी. या अर्जात भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही टप्प्यावर संपादणूक रद्द करण्यात येईल,’ असेही ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

परीक्षेच्या वेळी, निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दाखवणे अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्जातील नावात आणि आधारकार्डवरील नावाच्या नोंदीत कोणतीही तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. अर्ज सादर करताना उमेदवाराने तीन परीक्षा केंद्रांची निवड करणे अनिवार्य आहे. उमेदवारांना अधिक माहिती http://www.mscepune.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

अर्ज सादर करण्याची लिंक 
8 Comments
  1. Abhishek wankhede says

    Paper hard astat kaa?

    1. RojgarSandhi says
  2. Abhishek wankhede says

    Paper is hard

  3. Abhishek wankhede says

    No question

  4. Surekha Anil patil says

    Teacher Bharti aahe ka

    1. RojgarSandhi says

      MahaTET 2025 Aplication Form Registration Process..

  5. Varsha shivaji pawara says

    No

  6. Tommynug says

    hi

Leave A Reply

Your email address will not be published.