अदिती तटकरे यांनी दिली माहिती,लाडकी बहीणच्या पुढील हफ्ता कधी मिळणार!

Ladki Bahin May June Payment Date


सध्या मे महिन्याचा हफ्ता न मिळाल्यामुळे बहिणींना चिंता होती. याच संदर्भातील एक नवीन महत्वाची घोषणा अदिती तटकरेयांनी आज केली (Ladki Bahin May June Payment Date). मे महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. अशा परिस्थितीत लाखो महिलांच्या नजरा मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यावर खिळल्या होत्या. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः या योजनेशी संबंधित महत्त्वाची माहिती दिली आहे. पात्र लाडकी बहिणींना मे महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाईल असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. परंतु ११ वा हप्ता कधी जमा करायचा याची एक्साक्ट तारीख त्यांनी दिली नाही. 

Ladki Bahin May June Payment Date

तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

यातच त्या अजून म्हणाल्या कि, महाराष्ट्र सरकारच्या मंत्री अदिती तटकरे यांनी शुक्रवारी उघड केले की पडताळणी प्रक्रियेदरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेचा लाभ घेतलेल्या २,२०० हून अधिक महिला सरकारी कर्मचारी असल्याचे आढळून आले.

ते म्हणाले की, लाडकी बहिन योजनेच्या (लाडकी बहिन योजना) सुमारे दोन लाख अर्जांची तपासणी करताना, २,२८९ अर्जदार असे आढळून आले जे सरकारी कर्मचारी असताना या योजनेचा लाभ घेत होते. या लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. लाभार्थ्यांची पडताळणी ही एक नियमित प्रक्रिया असेल असे तटकरे म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी, सत्ताधारी महायुती सरकारने ऑगस्ट २०२४ मध्ये लाडकी बहिन योजना सुरू केली. या अंतर्गत, २१-६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये रक्कम दिली जाते. तथापि, सरकारी कर्मचारी या योजनेसाठी पात्र नाहीत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत दहा हप्ते देण्यात आले आहेत आणि लाभार्थी महिला अकराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.