नागपूर एम्स मध्ये रोबोटिक्स द्वारे गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया कशी कराल, पूर्ण माहिती
Knee Replacement Surgery AIIMS Nagpur Details
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (Knee Replacement Surgery AIIMS Nagpur Details), नागपूरने वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. एम्समध्ये नुकतीच पहिली रोबोटिक असिस्टेड गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. विशेष म्हणजे, विदर्भात हे प्रगत शस्त्रक्रिया तंत्रज्ञान स्वीकारणारे ‘एम्स’ हे पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे. या यशामुळे विदर्भासह आसपासच्या राज्यातील सांधेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी ‘एम्स’ आशेचे नवे किरण बनले आहे. आपल्याला माहीतच असेल एम्स नागपूर सतत आपल्या सेवांचा विस्तार करत आहे. तसेच AIIMS Nagpur Orthopedics येथे मनुष्यबळ वाढवण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत, जेणे करून रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील. मध्य भारतातील, विदर्भातील नागरिकांसाठी हे रुग्णालय आशेचे आणि दर्जेदार आरोग्यसेवेचे केंद्र बनले आहे.

रोबोटिक सर्जरीमुळे उत्तम परिणाम
- आर्थोपेडिक विभागाचे प्राध्यापक व प्रमुख डॉ. समीर द्विडमुठे यांनी रोबोटिक शस्त्रक्रियेचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, रोबोटिक शस्त्रक्रिया गुडघ्याच्या सांध्याची अधिक अचूक मांडणी आणि इम्प्लांट प्लेसमेंट सुनिश्चित करते, ज्यामुळे रुग्णांना खूप चांगले परिणाम मिळतात.
- या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण लवकर बरा होतो आणि वेदना कमी होतात. या शस्त्रक्रियेमुळे आसपासच्या ऊर्तीचे कमी नुकसान होते, ज्यामुळे वेदना आणि सूज कमी होते.
- गुडघ्याचे कार्य सुधारते आणि रुग्णांना अधिक नैसर्गिक हालचाल करण्यास मदत मिळते. या शस्त्रक्रियेदरम्यान आणि शस्त्रक्रियेनंतरच्या गुंतागुंतीची शक्यता कमी होते. गुडघ्याच्या इम्प्लांटचे आयुष्य वाढते आणि रुग्णांना दीर्घकाळ आराम मिळतो.
तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
महाराष्ट्रामध्ये, नागपूर, पुणे आणि मुंबई यांसारख्या शहरांमध्ये गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च खालील प्रमाणे अंदाजे असतो: (विशेषतः रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रियेसाठी जास्त असू शकतो).
- नागपूरमध्ये: साधारणपणे ₹1,50,000 ते ₹5,50,000 पर्यंत.
- पुण्यात: साधारणपणे ₹1,70,000 ते ₹2,90,000 पर्यंत.
- मुंबईमध्ये: साधारणपणे ₹1,50,000 ते ₹6,00,000 पर्यंत
- औरंगाबादमध्ये: साधारणपणे ₹1,50,000 ते ₹3,50,000 पर्यंत.
इंडियन ऑइल कॉपोर्रेशन लिमिटेड’च्या ‘कॉपोर्रेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) उपक्रमामुळे ही ऐतिहासिक कामगिरी शक्य झाली आहे, ज्याने एम्स नागपूरला अत्याधुनिक रोबोटिक प्रणाली प्रदान केली आहे. ‘एम्स’चे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जाशी यांनी आथोर्पेडिक विभाग आणि ऑपरेटिंग टीमला या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, एम्समधील ‘नी रिप्लेसमेंट’ शस्त्रक्रिया राज्यातील रुग्णांसाठी आशेचे किरण ठरेल. एम्सच्या आर्थोपेडिक विभागाने आतापर्यंत ६५० हून अधिक सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. यातील बहुसंख्य शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेतून पूर्णपणे निःशुल्क करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
