आयकर विभागात ४०५ पदे रिक्त, नवीन पदभरती तातडीने सुरु करा!! | Income Tax Department Bharti 2025
Income Tax Department Recuitment 2025
Income Tax Department Bharti 2025
प्रधान मुख्य आयकर आयुक्त (PCCIT) नागपूर विभागात अधिकारी आणि कर्मचान्यांची ४०५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचान्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे. एकीकडे आयकरदात्यांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे रिक्त पदे भरण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयातर्फे पुढाकार घेण्यात येत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, १ मार्च २०२५ पर्यंत आयकर नागपूर कार्यालयात १,२२७पदे मंजूर असून त्यापैकी ८९२ पदांवर कर्मचारी कार्यरत आणि ४०५ पदे रिक्त आहेत. तर ३१ मार्च २०१४ च्या आकडेवारीनुसार २२० पदे मंजूर होती. त्यापैकी ७१५ पदांवर कर्मचारी कार्यरत होते तर २७६ पदे रिक्त होती. सरकार देशात आयकरदात्यांची संख्या वाढविण्यावर भर देत आहे, तर दुसरीकडे करदात्यांना सेवा देणान्या कर्मचान्यांची संख्या कमी होत आहे. ही या विभागाची शोकांतिका आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज आहे. भरती प्रक्रियेने उच्च शिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे श्री. कोलारकर यांनी सांगितले.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC) आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) यांनी प्रधान मुख्य आयकर आयुक्त, नागपूर कार्यालयातील दिलेल्या आकडेवारीनुसार, १ मार्च २०२५ पर्यंत रिक्त पदांची संख्या ४०५ आहे. ही संख्या ३१ मार्च २०१४ पर्यंत २७६ होती. दहा वर्षाच्या कालावधीत रिक्त पदांच्या संख्येत १२९ ने वाढ झाल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी दाखल केलेल्या माहितीच्या अधिकाराच्या (RTI) अर्जाला पीसीसीआयटी, नागपूर कार्यालयाने माहिती दिली.
नागपूर शहरातील प्रधान मुख्य आयकर आयुक्त (Principal Chief Commissioner of Income Tax – PCCIT), नागपूर हे आयकर विभागातील एक महत्त्वाचे कार्यालय आहे. हे हे कार्यालय भारतीय आयकर विभागाच्या महाराष्ट्र आणि गोवा प्रदेशातील उच्च कार्यालयपैकी एक आहे आणि नागपूर क्षेत्रातील आयकर प्रशासनाचे प्रमुख म्हणून कार्य करते. नागपूरमधील PCCIT कार्यालय हे शहरातील आयकर विभागाचे सर्वोच्च आमो अत्यंत महत्वाचे कार्यालय आहे. येथे अनेक महत्वाचे उप विभाग कार्यरत असतात जे कर संकलन, मूल्यांकन, अपील आणि प्रशासकीय कामांमध्ये मदत करतात. या कार्यालयामार्फतच नागपूर आणि विदर्भ क्षेत्रातील आयकर विभागाचे कामकाज सुरळीतपणे चालते.
कोलारकर म्हणाले, दहा वर्षांनंतरही परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. कर्मचारी मानसिक आणि शारीरिक ताणतणाव कार्यरत असून त्यांच्या खांद्यावर कामाचा प्रचंड ताण आहे. दिनांक त्यामुळे त्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे देशात आयकर फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध सरकारी विभागांमधील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आयकर विभागात खूपच कमी कर्मचारी असल्याची माहिती आहे.
Post kay aahet
Ha mala job milel ka
Shar konte aahe
Ha ma job pahje ahee
Yes I Am Intrested
Post send pz
Education Kay magat aahe
Apply ks karaych aahe
Recurrent and post name
Education recruitment and post name