७८ हजार पगाराची कर्मचारी राज्य विमा महामंडळात ५५८ पदांसाठी भरती सुरु!

ESIC Bharti Form 588 Posts


ESIC Bharti Form 588 Posts

मित्रांनो, आम्ही एक महत्वाची बातमी घेऊन आलो आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC Bharti 2025) ने स्पेशालिस्ट ग्रेड-२ च्या पदांसाठी मोठी तब्बल ५८८ जागांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशीत केली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जून २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या भरती मध्ये स्पेशालिस्ट ग्रेड पदांच्या विविध जागा भरण्यात येत आहे. पदवीधर उमेदवारांना हि भरती हि सुवर्णसंधीच आहे. चला तर या भरती बद्दलची पूर्ण माहिती आणि अर्ज कसा करायचा हे जाणून घेऊया. 

खाली आम्ही रिक्त पदांची माहिती दिली आहे:

आता बघूया या भरती मध्ये कोणते पद भरण्यात येणार आहे. तसेच कोणत्या पदांची संख्या किती संख्या आहे तर.

  • स्पेशालिस्ट ग्रेड II (वरिष्ठ स्केल): १५५ पदे
  • स्पेशालिस्ट ग्रेड २ (ज्युनियर स्केल): ४०३ पदे
  • एकूण पदांची संख्या: ५५८

शैक्षणिक पात्रता काय आहे? 

  • संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी, एमडी/ एमएस/ एमसीएच/ डीएम/ डीए/ एमएससी/ डीपीएम.
  • ३ ते ५ वर्षांचा कामाचा अनुभव

वयोमर्यादा बद्दल पूर्ण माहिती

  • कमाल ४५ वर्षे
  • उमेदवारांना कमाल वयात सूट असेल.

पगार किती आहे?

  • पदानुसार दरमहा ६७,७०० – ७८,८०० रुपये
  • याशिवाय इतर भत्ते देखील दिले जातील

अर्ज करण्यास किती शुल्क लागेल 

  • सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस (पुरुष): ५०० रुपये
  • अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग/महिला/ईएसआयसी कर्मचारी/माजी सैनिक: मोफत

 

अर्ज कसा करावा ते बघूया

या भरतीसाठी उमेदवार ESIC च्या अधिकृत वेबसाइट www.esic.gov.in वर जाऊन ऑफलाइन अर्जाचा नमुना PDF फॉर्म डाउनलोड करू शकतात. यासोबतच, तुम्ही खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून सूचना आणि अर्ज फॉर्म देखील डाउनलोड करू शकता. यानंतर, तुम्ही अर्ज भरून आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून मुलाखतीला उपस्थित राहू शकता.

कर्मचारी राज्य विमा महामंडळाचा पत्ता:

कर्मचारी राज्य विमा निगम पंचदीप भवन कॉम्रेड इंद्रजित गुप्ता मार्ग नवी दिल्ली – 110 002

ESIC Bharti Form 588 Post महत्वाच्या लिंक्स 

Leave A Reply

Your email address will not be published.