सेंट्रल बँकेत फ्रेशर्सला नोकरीची संधी; ४५०० पदांसाठी जम्बो भरती सुरु!

Central Bank Of India Recruitment For Freshers


बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सध्या भरती सुरु आहे.सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्ही फ्रेशर्स असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही बातमी खूप महत्त्वाची आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीमअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. यासाठी तुम्हाला नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS)च्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजे nats.education.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Central Bank Of India Recruitment)

Central Bank Of India Recruitment

तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी. २० ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील अप्रेंटिस पदासाठीची ही भरती ४५०० जागांसाठी होणार आहे. तुमच्याकडे नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. सर्वात आधी तुम्ही nats.education.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे. तिथे स्वतः ला रजिस्टर करायचे आहे. त्यानंतर लॉग इन करावे. यानंतर तुमची सर्व माहिती भरावी. यानंतर निर्धारित शुल्क भरुन फॉर्म सबमिट करावा. या फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

या अप्रेंटिसशिपचा कालावधी १२ महिन्याचा असणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८०० रुपये फी भरावी लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

5 Comments
  1. Mayuri Salave says

    No

  2. Prajyot Ashok Anmulwar says

    Degree konti pahije

  3. Divya Jumade says

    Internship mdhe payment bhetela ka

  4. Divya Jumade says

    Me tumala vi4l internship kartani salary bhetela ka

  5. shdfuhmwju says

    fggmmdllglyossqxmgqxyffogopfxv

Leave A Reply

Your email address will not be published.