बँक ऑफ बडोदामध्ये दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी! 500 जागांसाठी भरती सुरू!
BOB Bharti 2025 For 500 Posts Peon
मित्रांनो, नमस्कार, आजच प्राप्त माहिती नुसार बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक अत्यंत जबरदस्त बातमी आहे. बँक ऑफ बडोदा या देशातील नामांकित बँकेने दोन वेगवेगळ्या पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये “ऑफिस असिस्टंट (शिपाई)” या पदासाठी तब्बल ५०० रिक्त जागा, तर “व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक” या पदासाठी ०३ जागा उपलब्ध आहेत. या पैकी शिपाई पदभरती हि तर फारच मोठी भरती सध्या सुरु झाली आहे. आणि एक सांगू हि भरती १० वी पास उमेदवारांसाठी एकदम जबरदस्त पर्वणीच आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. बँक ऑफ बडोदामध्ये (BOB Bharti 2025 For 500 Posts Peon) ऑफिस असिस्टंट पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी एकूण ५०० जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवार ३ मे २०२५ पासून बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ मे २०२५ आहे. लक्षात ठेवा शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास आहे. आणि हो मित्रांनो, निवड प्रक्रिया परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीद्वारे केली जाईल. चला तर या भरती बद्दल अन्य महत्वाची माहिती बघूया..! आणि हो सर्व अपडेट्ससाठी रोजगारसंधीच्या व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन व्हायला विसरू नका, म्हणजे आम्ही तुम्हाला सर्व महत्वाचे जॉब्स अपडेट्स सोप्या भाषेत आणि अचूक माहिती सोबत देत राहू!
बँक ऑफ बरोडा पदभरतीची तपशीलवार माहिती
- पदाचे नाव – ऑफिस असिस्टंट (शिपाई Peon cum Assistant)
- पदसंख्या – 500 जागा
- शैक्षणिक पात्रता – १० वी पास उमेदवार अर्ज करू शकतात, तरी एकदा खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक बघावी हि विनंती
- वयोमर्यादा –तर उमेदवारांनो, ही भरती २१ ते ६५ वयोगटातील उमेदवारांसाठी खुली असून, इच्छुकांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो, याची नोंद घ्यावी आणि आपले अर्ज काळजीपूर्वक भरावे.
- अर्ज शुल्क –
- Rs.600/- + Applicable Taxes + Payment Gateway Charges for General, EWS & OBC candidates
- Rs.100/- + Applicable Taxes + Payment Gateway Charges for SC, ST, PwBD, EXS, DISXS & Women candidates
- अर्ज पद्धती – ऑनलाईन – लिंक खाली दिली आहे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मे 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
- नोकरीचे ठिकाण (Job Location): मुंबई, तसेच संपूर्ण भारत
बँक ऑफ बरोडा भरतीच्या महत्वाच्या तारखा
महत्वाच्या तारखा (Importants Dates):
- – ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 3 मे 2025
- – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 मे 2025 (23:59 पर्यंत)
अर्ज कसा करायचा?
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.bankofbaroda.co.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जाचा इतर कोणताही मार्ग/पद्धती स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
तसेच, अर्ज करण्याआधी, उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक(मोबाईल नंबर OTP आणि अन्य अपडेट्स साठी) असणे आवश्यक आहे. हा भरती प्रकल्प पूर्ण होईपर्यंत तो सक्रिय ठेवावा. बँक नोंदणीकृत ईमेल आयडीवर निवड प्रक्रियेसाठी कॉल लेटर पाठवू शकते. जर उमेदवाराकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी नसेल, तर त्याने अर्ज करण्यापूर्वी त्याचा/तिचा नवीन ईमेल आयडी तयार करावा. अन्य विस्तृत माहिती PDF मध्ये दिलेली आहे.
आता बघूया निवड प्रक्रिया कशी राहणार आहे ?
मित्रानो, या भरतीची निवड प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि तीन टप्प्यात होणार आहे:
- पहिला टप्पा म्हणजे CBT म्हणजेच कॉम्प्युटर आधारित परीक्षा: ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल. यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि इतर विषयांवर प्रश्न विचारले जातील.
- दुसरा टप्पा DV चा – कागदपत्रांची पडताळणी: ज्या उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावले जाईल. यामध्ये उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखीचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- आणि तिसरा आणि अंतिम टप्पा म्हणजे वैद्यकीय तपासणी: कागदपत्रे पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.
या भरती संदर्भातील महत्वाच्या लिंक |
|
📑 PDF जाहिरात |
PDF लिंक |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://ibpsonline.ibps.in/bobapr25/ |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.bankofbaroda.in/ |