बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ३३० पदांसाठी भरती सुरु! – Bank Of Baroda Bharti
Bank Of Baroda Bharti
बँक ऑफ बडोदामध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदामध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेत एकूण ३३० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये (Bank Of Baroda Recruitment PDF) असिस्टंट मॅनेजर, डेप्यूटी मॅनेजर, सायबर सिक्युरिटी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. www.bankofbaroda.in ही अधिकृत वेबसाइट आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला शुल्क भरायचे आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये शुल्क भरायचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे होणार आहे.
बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तरीख १९ ऑगस्ट २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
पात्रता (Eligibility For Bank Of Baroda Bharti) Educational Qualification For BOB Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उपव्यवस्थापक | Bachelor’s Degree in Computer Science/Iinformation Technology or related field. |
एव्हीपी १ | BE / BTech (Computer Science / Information Technology / Information Security /Cybersecurity /Electronics /Electronics & Communications / Software Engineering |
सहाय्यक व्यवस्थापक | Bachelor’s degree (any discipline) |
तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. बीई, बीटेक, एमई, एमटेक किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये एमएससी पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी विविध पदांसाठी पात्रता वेगवेगळी असते. त्यामुळे इच्छुकांनी आधी अधिसूचना वाचा त्यानंतरच अर्ज करावेत.
या नोकरीसाठी वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या नोकरीसाठी २२ ते ३१ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच पदानुसार ३१ ते ४८ वयोगटातीलदेखील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
Important Links For bankofbaroda.in Job 2025 | |
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/0Jpgd |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/PPSg2 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.bankofbaroda.in/ |