१२ वी पास महिलांना अंगणवाडीत नोकरीची सरळ मुलाखतीद्वारे संधी, अर्ज सुरु – Anganwadi Madatnis Bharti 2025
Anganwadi Madatnis Bharti 2025
आज प्रकाशित झालेल्या नवीन जाहिराती नुसार १२ वी पास महिलांना सरळ सरकारी नोकरीची संधी मिळाली आली. महिला बाल विकास विभागाच्या अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” या पदाच्या भरती साठी जाहिराती प्रकाशित झाली असून या साठी ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. या भरती बद्दलची पूर्ण माहिती आणि अधिकृत जाहिरात येथे रोजगारसंधी वर आम्ही देत आहोत. या प्रकाशित नवीन जाहिराती नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अहिल्यानगर पश्चिम या कार्यालय अंतर्गत येणान्या अकोले नगरपंचायत क्षेत्रातील एकुण 02 अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र स्थानिक रहिवासी असलेल्या महिला उमेदवारांकडुन २ जून २०२५ पासून १३ जून २०२५ पर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जाचा नमुना आणि PDF जाहिरातीची लिंक आम्ही खाली दिलेली आहे. आणि हो सर्व अपडेट्ससाठी रोजगार संधीच्या व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन व्हायला विसरू नका, म्हणजे आम्ही तुम्हाला सर्व महत्वाचे जॉब्स अपडेट्स सोप्या भाषेत आणि अचूक माहिती सोबत देत राहू!
या भरतीसाठी महिला उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे. अन्य कुठल्याही मार्गे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच एक लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२५ आहे. त्या मुळे उमेदवारांची दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधी आपले अर्ज दिलेल्या पत्यावर सादर करावेत.
अंगणवाडी मदतनीस पदभरती बद्दल संक्षिप्त माहिती
- पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
- शैक्षणिक पात्रता – किमान १२ वी पास किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेले महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्जदार किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 12 वीचे गुणपत्रकाची सत्यप्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक असुन सदरील गुणपत्रक आवश्यक राहील. 12 वी व त्यापुढील शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराने अर्जात दर्शविलेल्या आवश्यक शेर्भाणक कागदपत्राच्या छायांकित प्रती सांक्षाकित करुन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा – अंगणवाडी मदनिस या पदासाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे व कमाल 35 वर्षे राहिल, तसेच विधवा उमेदवारासाठी 4 कमाल वयोमर्यादा 40 वर्षे राहिल. त्याकरीता शाळा सोडल्याचा दाखला किंवा 12 वी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखल्याची सत्यप्नत जोडणे आवश्यक राहिल. उमेदवाराचे किमान व कमाल वय (दि. 13/06/2025) रोजीच्या दिनांकास गणण्यात येईल.
- किमान १८ व कमाल ३५ वर्षे
- विधवा उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा – 40 वर्षे
- नोकरी ठिकाण – अहिल्यानगर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर शहर, वेदांत कॉलनी, पहिला मजला, डॉ. साताळकर हॉस्पीटल शेजारी, बागरोजा हडको, दिल्ली गेट, अहिल्यानगर 4140001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://ahmednagar.nic.in/
तसेच, रिक्त पदांचा तपशिल दर्शविणाऱ्या तक्ता अ मधील सर्व अंगणवाडी मदतनीस रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांस मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. इ. 10 वी अथवा त्यापुढील शेणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्त्तीर्ण असणे आवश्यक राहिल.
या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदाच्या सरळ नियुक्ती संदर्भात पद भरतीची सुचना व विहित अर्ज नमुना, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अटी व शतीं https://ahilyanagar.maharashtra.gov.in in या संकेतस्थळावर किंवा खालील दिलेल्या PDF जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे. सदर संकेत स्थळावरुन अंगणवाडी मदतनीस भरतीसाठीचा अर्जाचा नमुना किंवा खालील लिंक वरून डाऊनलोड करुन घेऊन अर्ज परिपुर्ण भरुन सर्व कागदपत्रांसह बंद लिफाफ्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अहिल्यानगर पश्चिम, वेदांत कॉलनी, पहिला मजला, बागरोजा हडको, डॉ. साताळकर हॉस्पीटल जवळ, दिल्ली गेट अहिल्यानगर पश्चिम 414001 या कार्यालयाच्या पत्यावर कार्यालयीन वेळेत समक्ष किंवा पोस्टाने विहीत मुदतीत सादर करावा.
आवश्यक प्रमाणपत्र / कागदपत्र : या भरतीसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांनी खालील कागदपत्र आपल्या जवळ तयार ठेवावी.
1) अर्जातील नावाचा पुरावा : आधार कार्ड.
2) वयाचा पुरावा : जन्म नोंदणी दाखला / शाळा सोडल्याचा दाखला.
3) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र : 10 वी, 12 वी / डिप्लोमा व संविधानिक विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र.
4) मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा : जात प्रमाणपत्र
5) हिंदी व मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा : 10 वी प्रमाणपत्र
6) संगणक ज्ञान पुरावा : एम.एस.सी.आय.टी. अथवा समकक्ष शासन प्रमाणित संगणक प्रमाणपत्र
7) लहान कुटुंबाचे विहित नमूना प्रमाणपत्र.
8) अनुभव प्रमाणपत्र : संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना.प्र.) यांनी निर्गमित केलेले पदोन्न्ती पात्रता विहित नमूना प्रमाणपत्र.
9) लग्न झाले असल्यास नावात बदल झाल्याचा पुरावा : विहित नमून्यातील प्रमाणित गॅझेट प्रत.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Anganwadi Madatnis Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात लिंक | https://shorturl.at/qu4jt |
✅ अधिकृत वेबसाईट लिंक |
https://ahmednagar.nic.in/ |