सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भूकरमापकांच्या ९०३ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू!

Maharashtra Bhukarmapak Bharti 2025


Maharashtra Bhukarmapak Bharti 2025 – The recruitment process has been started for a total of 903 vacant posts in the Land Records Department, Group C Surveyor cadre under the Revenue Department for Maharashtra Bhukarmapak Recruitment 2025. This is a great opportunity for the youth to join the state service. Interested candidates should submit their applications online by October 24, 2025, Revenue Minister Chandrashekhar Bawankule has informed. There are 83 posts vacant in the Pune division, 259 posts in Konkan, 124 posts in Nashik, 210 posts in Chhatrapati Sambhajinagar, 117 posts in Amravati, and 110 posts in Nagpur division in the Surveyor cadre, so total 903 vacancies are there. The application process for these posts has started from October 1. Interested candidates have until 11.59 pm on October 24 to apply. The proposed date of the examination for this is November 13 and 14. The date of the examination may change due to planning, the advertisement published by the Land Records Department has stated.

महसूल विभागांतर्गत येणाऱ्या भूमीअभिलेख विभागातील गट क भूकरमापक संवर्गातील एकूण ९०३ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्याच्या सेवेत सामील होण्यासाठी ही तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन सादर करावेत, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. भूकरमापक संवर्गातील पुणे विभागात ८३ पदे, कोकण २५९ पदे, नाशिक १२४, छत्रपती संभाजीनगर २१० पदे, अमरावती ११७ पदे, नागपूर विभागात ११० पदे रिक्त आहेत. या पदांसाठी १ ऑक्टोबरपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांना २४ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. यासाठी परीक्षेची प्रस्तावित तारीख १३ आणि १४ नोव्हेंबर अशी आहे. नियोजनाच्या दृष्टीने परीक्षेच्या तारखेत बदल होऊ शकतो, असे भूमी अभिलेख विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केले आहे.
या पदासाठी १९,९००- ६३,२०० रुपये अशी वेतन श्रेणी आहे.

Maharashtra Bhukarmapak Bharti 2025

 

  • पदाचे नाव – भूकरमापक
  • पद संख्या –903
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे
  • परीक्षा शुल्क –
    • अमागास वर्ग – 1000/-
    • मागास वर्ग – 900/-
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 ऑक्टोबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑक्टोबर 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता

  • भूकरमाफक (गट-क) पदासाठी (Land Surveyor Recruitment) उमेदवाराचे वय १८ ते ३८ दरम्यान असावे.
  • यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातून अथवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी (Diploma in Civil Engineering) अथवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावी.
  • त्याच्याकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र असायला हवे.
  • मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र अथवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र असावे.

काय आहेत निवडीचे निकष?

  • गुणवत्ता यादीत समावेश करण्यासाठी उमेदवाराने (Computer Based Test) परीक्षेत एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
  • एकाच पदासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांनी समान गुण मिळाल्यास ४ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्राधान्य क्रमाच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील

 

Leave A Reply

Your email address will not be published.