महिला बालविकास विभागात १२वी पास महिलांना “अंगणवाडी सेविका” म्हणून सरळ सरकारी नोकरीची संधी!
Anganwadi Sevika Bharti
Anganwadi Sevika Bharti – Mahila Bal Vikas Vibhag Bharti – १२ वी पास महिला उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची एक सुवर्णसंधी चालून आली आहे. महत्वाचे म्हणजे हि एक खूप मोठ्ठी भरती असून यात तब्बल १९ हजार पेक्षा जास्त पदे भरती जाणार आहे आणि या भरतीची जाहिरात प्रकाशित सुद्धा झाली आहे. हि भरती आहे अंगणवाडी सेविकांची. तसेच या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जुलै २०२५ आहे. त्याचबरोबर अर्जात काही बदल करण्याची शेवटची तारीख ७ जुलै २०२५ ठेवण्यात आली आहे.

आपल्याला माहीतच असेल अंगणवाडी सेविका हा एक महिला बाल विकास विभागाचा महत्वाचा घटक आहे. तसेच एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS Mahila Bharti) योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि ग्रामीण आणि शहरी भागातील बालके, गर्भवती महिला, माता यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष लक्ष देणे,बालकांचे नियमित लसीकरण सुनिश्चित करणे, समाजामध्ये सरकारी योजनांची माहिती पोहोचवणे आणि त्यांची अंमलबजावणी करण्यास मदत करणे थोडक्यात, अंगणवाडी सेविका ह्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणाची काळजी घेण्यासाठी तसेच त्यांना प्राथमिक शिक्षण देण्यासाठी समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या महत्त्वाच्या दुवा आहेत. त्यांचे कार्य केवळ आरोग्य आणि शिक्षणापुरते मर्यादित नसून, ते सामाजिक जागृती आणि सामुदायिक विकासातही मोठे योगदान देतात. याचा महत्वाच्या पदासाठी हि भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. चला तर माहिती करूया या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे आणि अन्य माहिती.
अंगणवाडी सेविका भरती बद्दल संक्षिप्त माहिती
- एकूण पदसंख्या: १९,५०४
- पदांचे नाव:
- अंगणवाडी सेविका – २,०२७ पदे
- अंगणवाडी सहाय्यक – १७,४७७ पदे
- आरक्षण: सर्व पदे महिला उमेदवारांसाठी राखीव
- अर्ज शुल्क : १००/- + GST
- पगार :
- अंगणवाडी सेविका: दरमहा ₹१०,५००/-
अंगणवाडी मदतनीस: दरमहा ₹७,०००/-
पर्यवेक्षक: दरमहा ₹२०,२००/-
- अंगणवाडी सेविका: दरमहा ₹१०,५००/-
- अर्ज सुरू होण्याची तारीख: २० जून २०२५
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: ४ जुलै २०२५
आता बघूया पात्रता काय आहे?
अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सहाय्यक पदासाठी अर्ज करण्यासाठी, महिला उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून उच्च माध्यमिक ( म्हणजेच १२ वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवार ग्रामीण भागातील त्याच महसूल गावातील आणि ज्या शहरी/शहरी भागात रिक्त पद भरायचे आहे त्या शहरी/वॉर्डमधील त्याच वॉर्डचे रहिवासी असणे आवश्यक आहे. इतर गावातील/वॉर्डमधील महिला अर्ज करण्यास पात्र नाहीत. या संदर्भातील माहिती खालील PDF जाहिराती मध्ये दिली आहे.
तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
या अंगणवाडी भरतीसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया एमपी ऑनलाइनच्या निवड पोर्टलद्वारे किंवा ऑनलाईन किओस्क प्रक्रिये द्वारे अर्ज सादर करता येईल. तसेच या भरतीसाठी अर्जदारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. याशिवाय, १८ टक्के जीएसटी देखील कापला जाईल. अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या आल्यास, तुम्ही ०७५५-६७२०२०८ या हेल्पलाइन क्रमांकावर देखील संपर्क साधू शकता.
या भरतीसाठी अर्ज सादर करताना लागणारी महत्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- शाळेचा दाखला
- जन्म प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- ओळखपत्र
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
अर्ज कसा करायचा ?
- अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खाली दिली आहे आहे. खाली दिलेलीच लिंक वरून किंवा https://mpwcdmis.gov.in या लिंक वरून ऑनलाइन अर्ज करावा.
- महिला आणि बाल विकास विभागाच्या मध्य प्रदेश आणि एकात्मिक बाल विकास सेवांच्या ऑनलाइन अर्जासाठी, अधिकृत वेबसाइट https://mpwcdmis.gov.in ला भेट द्या.
- तसेच अर्ज करण्याआधी अधिकृत वेबसाइट वर दिलेली किंवा खालील लिंक वरून अंगणवाडी २०२५ PDF जाहिरात डाउनलोड करा आणि ती काळजीपूर्वक वाचा.
- यानंतर, तुम्हाला खाली दिलेल्या ऑनलाइन अर्ज करण्याच्या लिंकवर जावे लागेल.
- या लिंकवर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल, फॉर्ममध्ये विचारलेले सर्व तपशील आणि माहिती वाचल्यानंतर, तुमच्या कागदपत्रांनुसार काळजीपूर्वक भरा.
- सर्व तपशील भरल्यानंतर, आवश्यक ती कागदपत्रअपलोड करा.
- आता खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून फॉर्म सबमिट करा.
- यानंतर, शेवटी भविष्यातील तपासणीसाठी फॉर्मची प्रिंट आउट घ्या.

Bhartichi vayomryada kiti aahe
Ansar sanga