जिल्हा न्यायालयात ऑफिस असिस्टंटची भरती सुरु, सरळ नोकरीची संधी! 15,000 रुपये पगार!

District Court Bharti 2025


Beed District Court Bharti 2025

मित्रांनो, सरकारी नोकरी शोध असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. बीड जिल्हा न्यायालयामध्ये कार्यालयीन सहाय्यक (District Court Bharti 2025 Office Assistant) पदासाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. हि जाहिरात साठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकता. मुख्य म्हणजे हि नोकरी आपल्याला सरळ मुलाखतीद्वारे मिळणार आहे. आणि पगार सुद्धा चांगलं आहे.  आपल्याला माहीतच असेल कायदा व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही संधी विशेषतः कायद्याच्या क्षेत्रात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी उपयुक्त ठरू शकते. बीड जिल्हा न्यायालय हे महाराष्ट्र राज्यातील न्यायव्यवस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या न्यायालयामार्फत जिल्ह्यातील विविध प्रकारच्या नागरी, फौजदारी, कौटुंबिक तसेच इतर कायदेशीर प्रकरणांची सुनावणी केली जाते. जनतेला न्याय मिळवून देणे, कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे आणि सामाजिक समतेला बळकटी देणे ही या न्यायालयाची प्राथमिक उद्दिष्टे आहेत. नागरिकांना जलद आणि पारदर्शक न्याय मिळावा यासाठी न्यायालयीन प्रशासनामध्ये सतत सुधारणा करण्यात येत असते. या ठिकाणी नोकरी करणे म्हणजे सामाजिक दृष्ट्या एक अभिमानाची गोष्टच आहे. चला तर अर्ज प्रक्रिया आणि अन्य माहिती बघूया!

बीड जिल्हा न्यायालयामध्ये कार्यालयीन सहाय्यक भरतीबद्दल संक्षिप्त माहिती 

  • पदाचे नाव: ऑफिस असिस्टंट (Office Assistant)
  • पदसंख्या: 01 पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे
  • भरती ठिकाण: जिल्हा न्यायालय, बीड, महाराष्ट्र
  • शैक्षणिक पात्रता: किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. यामध्ये कायद्याची पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
    • कौशल्य आवश्यकताः संगणक टायपिंग अत्यावश्यक आहे. मराठीमध्ये किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये किमान 40 शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग आवश्यक आहे. अन्य माहिती साठी कृपया जाहिरात वाचावी.
  • वेतनमान : दरमहा ₹15,000/- मानधन स्वरूपात दिले जाईल.
  • अर्ज पद्धत: ऑफलाइन (स्वतः न्यायालयात किंवा डाकाद्वारे अर्ज सादर करावा)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय परिसर, बीड-431122
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2025

वयोमर्यादा :

  • किमान वय – 18 वर्षे
  • कमाल वय – 38 वर्षे
    (आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयात सवलत लागू होईल.)

पगार : 

  • या पदासाठी मासिक मानधन स्वरूपात ₹15,000/- इतके वेतन दिले जाईल.
  • ही भरती कंत्राटी (Contractual) स्वरूपाची असण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याची मुदत आणि शर्ती मूळ जाहिरातीत पाहाव्यात.
तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

ऑफिस असिस्टंट या पदाचे कामाचे स्वरूप :
ऑफिस असिस्टंट हे पद प्रशासनातील मदतनीस म्हणून कार्य करते. न्यायालयीन कार्यालयामध्ये टायपिंग काम, विविध फाईल्सची नोंदणी, दस्तऐवजांची छाननी, कागदपत्रांची छायांकित प्रत तयार करणे, संगणक प्रणालीवर माहिती प्रविष्ट करणे, आवश्यक तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहाय्य करणे ही या पदाची प्रमुख जबाबदारी असते. न्यायालयीन कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी ऑफिस असिस्टंटचा महत्त्वाचा वाटा असतो.

कोण अर्ज करू शकतो?

  • या भरतीसाठी महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना या पदासाठी प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. तरीपण बीड जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य मिळणार आहे.
  • जर आपण पदवीधर आहेत आणि कायद्याची पार्श्वभूमी असेल तर अशा उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. त्यांना सुद्धा यात प्राधान्य मिळेल.
  • तसेच मित्रांनो, संगणक व टायपिंगमध्ये प्रावीण्य असलेल्या तरुणांना सरकारी कार्यालयात काम करण्याची प्रत्यक्ष संधी.

तसेच, या पदावर कार्यरत असताना न्यायालयीन प्रक्रियेची प्राथमिक माहिती मिळते, जी भविष्यातील कायद्याच्या क्षेत्रातील कारकीर्दीसाठी उपयुक्त ठरते. संगणक कौशल्य, दस्तऐवज व्यवस्थापन, टायपिंग क्षमता आणि कार्यालयीन कामकाजातील शिस्त या गोष्टींवर भर दिला जातो. निश्चितच हा अनुभव आपल्या करियर साठी महत्वाचा ठरेल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For districts.ecourts.gov.in Bharti 2025

📑PDF जाहिरात आणि अर्जाचा नमुना
https://t.co/zIgEYn9bWK
✅ अधिकृत वेबसाईटhttps://beed.dcourts.gov.in/

 

Beed District Court Bharti 2025 – Friends, there is important news for candidates looking for government jobs. Beed District Court has published a recruitment advertisement for the post of Office Assistant (District Court Bharti 2025 Office Assistant). Graduate candidates can apply for this advertisement. The main thing is that you will get this job directly through an interview for this Beed District Court Bharti 2025.

1 Comment
  1. Amol says

    छान माहिती मिळाली

Leave A Reply

Your email address will not be published.