एक क्लिक वर मिळवा गाव कारभाराची माहिती शासनाने आणले ‘मेरी पंचायत’ अँप – Meri Panchayat App Maharashtra
Meri Panchayat App Maharashtra Download Link
Meri Panchayat App Maharashtra – डिजिटल युगात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात पारदर्शकता यावी, यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने ‘मेरी पंचायत’ अॅप आणले आहे. या माध्यमातून ग्रामस्थांना आता आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार कसा सुरू आहे, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. केंद्र तसेच राज्य शासनाकडून ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर दिला जात आहे. विकासात येणारे अडथळे दूर व्हावेत, यासाठी थेट ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला जात आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता असावी व आपल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत काय विकास सुरू आहे, कोणत्या योजना आल्या आहेत, शासनाकडून किती निधी मिळाला, आदी माहिती सहजरीत्या उपलब्ध होणार आहे. त्यासाठीच केंद्र शासनाने ‘मेरी पंचायत’ (Meri Panchayat) हे अँप आणले आहे. या बद्दल पूर्ण माहिती आणि अप डाउनलोड करण्याची लिंक आम्ही खाली दिली आहे.

ग्रामस्थांना अभिप्राय नोंदवता येणार स्थानिक पातळीवरील एखाद्या विकासकामाची सूचना फोटोसह सूचित करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊ शकता. तसेच काही समस्यांचे फोटो अपलोड करून झालेल्या कामातील चुका किंवा त्या कामाचे कौतुक समोर आणता येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या कामाबाबत ग्रामस्थांना आपला अभिप्राय नोंदवता येणार आहे.
– ‘मेरी पंचायत’ अॅपच्या माध्यमातून ग्रामस्थांना ग्रामपंचायत सदस्य किती.
– एकूण किती समित्या स्थापन केल्या असून, त्यांचे अध्यक्ष कोण आहेत. – नोटीस बोर्डाच्या माध्यमातून ग्रामस्थांना काय सूचना दिल्या आहेत.
– ग्रामपंचायतीला मिळणारे अनुदान कोणत्या प्रकारचे आहे.
आर्थिक लेखाजोखा समोर येणार
तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
Meri Panchayat अँप वर काय माहिती मिळणार
– कोणत्या योजनेतून विकासकामे सुरू आहेत.
– ग्रामपंचायतीची एकूण बँक खाती किती आहेत.
– कोणत्या कामासाठी किती रक्कम खर्च केली.
– गावात पाण्याचे स्रोत व नळ कनेक्शन किती आहेत.
