१० वी पास लाडक्या बहिणींना दर महिन्याला मिळणार 7000 रुपये -सरकारची लवकरच नवी योजना जाहीर!
Ladki Bahin 7 Thousand for 10th pass mahila
7 thousand per month for 10th pass mahila बहनींनो आनंदाची बातमी- योजने सोबतच मिळणार ७००० जास्तीचे! कसे जाणून घेऊया! सध्या राज्यात धुडकुल घालत असलेली लाडकी बहीण योजनेचा नवीन अपडेट समोर आला आहे. हि बहिणींसाठी एक जबरदस्त महत्वाची बातमी आहे. या अंतर्गत, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे! आता १० वी पास महिलांना दर महिन्याला 7000 रुपये मिळणार आहेत. ही योजना म्हणजेच Didi Yojana 2025, जी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमकी ही योजना कोणती आहे, त्याचा अर्ज कसा करायचा, आणि कोणती कागदपत्रे लागणार आहेत.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकार वेळोवेळी विविध योजना राबवत असतात. यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, माजी कन्या भाग्यश्री योजना, लेक लाडकी योजना अशा अनेक योजना येतात. याच पंक्तीत आता केंद्र सरकारने आणलेली दीदी योजना, म्हणजेच विमा सखी योजना, ग्रामीण भागातील महिलांसाठी एक नवी संधी घेऊन आली आहे. या योजनेत जुळणाऱ्या बहिणीसाठी पैसे कमवण्याची एक मोठी संधी मिळणार आहे. नेमही क्षे मिळणार पैसे हे बघूया.
या योजनेस आवश्यक कागदपत्रे कोणते ते बघूया
- आधार कार्ड
- पत्ता पुरावा
- बँक खाते तपशील
- शैक्षणिक पात्रता पुरावा
- पासपोर्ट साइज फोटो
तर विमा सखी योजना ही एलआयसी आणि सरकार (LIC) द्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवली जाते. या योजनेत महिलांना विमा एजंट म्हणून प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी दिली जाते. हि योजना निश्चितच महिलांना पैसे कमवण्याची मस्त संधी देत आहे.
तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
या योजने साठी अर्जदार महिला किमान 10वी पास आणि वय 18 ते 70 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण कालावधीत त्यांना तीन वर्षांसाठी दरमहा स्टायपेंड दिला जातो—पहिल्या वर्षी ₹7,000, दुसऱ्या वर्षी ₹6,000 आणि तिसऱ्या वर्षी ₹5,000, त्याचबरोबर विमा पॉलिसी विक्रीवर कमिशन सुद्धा दिले जाते. या योजनेद्वारे महिलांना एलआयसी एजंट म्हणून काम करण्याची संधी मिळते, तसेच पुढे डेव्हलपमेंट ऑफिसर पदासाठीही अर्ज करता येतो. ‘विमा सखी’ उपक्रम महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे.
विमा सखी योजनेसाठी अधिकृत अर्ज कसा करायचा याची माहिती खाली दिली आहे:
- 🔗सर्व प्रथम https://www.licindia.in या वेबसाईट वर जावे लागेल.
- वेबसाईटवर गेल्यावर, “Join As Agent” किंवा “Bima Sakhi” या विभागात क्लिक करा.
- तेथे तुम्हाला पात्रता, प्रशिक्षण, अर्ज प्रक्रिया आणि संपर्क तपशील मिळतील.
- तुम्ही नजीकच्या LIC शाखेत जाऊन प्रत्यक्ष अर्ज करू शकता किंवा त्यांच्या शाखा अधिकारी/विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करू शकता.
