बारामती नगर परिषदमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु, सरळ मुलाखतीतून होणार निवड!
Baramati nagar parishad recruitment 2025
बारामती नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळातर्फे जून २०२५ मध्ये शिक्षक (पुरुष/महिला) आणि दाई (महिला) पदांच्या एकूण २६ जागांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवार ९ जून २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता शारदा प्रांगण बारामती येथे मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रांसह हजर राहू शकतात. शैक्षणिक पात्रता आणि इतर माहितीसाठी बारामती नगरपरिषदेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. बारामती नगरपरिषद, शिक्षण मंडळ (बारामती नगरपरिषद) द्वारे जून 2025 मध्ये शिक्षक (पुरुष/महिला), दाई – आया (महिला) पदांच्या एकूण 26 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी 9 जून 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता शारदा प्रांगण बारामती नगर परिषद शाळा क्र, 7 येथे मुलाखतीसाठी बायोडाटा आणि आवश्यक कागदपत्रांसह हजर राहावे. बारामती नगरपरिषद, पुणे यांच्यामार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- पदाचे नाव – शिक्षक/शिक्षिका, दाई (स्त्री)
- पदसंख्या – 26 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – बारामती, जि. पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – शारदा प्रांगण बारामती नगरपरिषद शाळा क्र. ७
- मुलाखतीची तारीख – ९ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – http://baramatimunicipalcouncil.in/
बारामती नगरपरिषद अंतर्गत शिक्षक आणि दाई पदांसाठी भरती होणार आहे. बारामती नगरपरिषद, शिक्षण मंडळ (बारामती नगरपरिषद Baramati Nagar Parishad Bharti 2025 Update) यांच्या जाहिरातीनुसार एकूण २६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी बारामती नगरपरिषदेच्या अधिकृत वेबसाईट baramatimunicipalcouncil.in वर जाऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता.
शैक्षणिक पात्रता : शिक्षक (महिला) पदासाठी मॉन्टेसरी कोर्स किंवा प्राथमिक कोर्स किंवा एचएससी, डी. एड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दाई पदासाठी 7 वी पास असणे आवश्यक आहे. कला शिक्षक (पुरुष/महिला) पदासाठी एडीडी (Art Teacher Diploma) आवश्यक आहे. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीचे ठिकाण शारदा प्रांगण, बारामती नगर परिषद शाळा क्र. 7 हे आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.