डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे, सांगली येथे विविध पदांची भरती जाहिरात प्रकाशित, अर्ज सुरु!
Deccan Education Sangli Society Jobs
डेक्कन एज्युकेशन सोसायटी (DES), चिंतामणराव इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, पुणे यांनी नवीन भरतीसाठी एक जाहिरात प्रकाशित केली आहे. या नवीन जाहिराती नुसार येथे सामान्य व्यवस्थापन विभागासाठी संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वित्त व्यवस्थापनासाठी सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हि भरती म्हणजे डेक्कन एज्युकेशन येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे. हि भरती एकूण ०५ रिक्त पदांकरिता करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने https://www.despune.org/ या अधिकृत वेबसाईटवरून अर्जाची PDF उपलब्ध आहे किंवा खालील लिंक वरून सुद्धा तुम्ही पूर्ण PDF जाहिरात आणि अर्ज नमुना PDF डाउनलोड करू शकता. तसेच अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत (अंदाजे २९ मे २०२५ पर्यंत) अर्ज सादर करावेत. तरी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
थोडी माहिती डेक्कन एज्युकेशन सोसायटी बद्दल
मित्रांनो, डेक्कन एज्युकेशन सोसायटी हि एक ३८ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली नामांकित संस्थान आहे.डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही भारताच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाची जागा असलेली एक नामवंत संस्था आहे. सन १८८४ मध्ये काही संस्थेतील दूरदृष्टी असलेल्या विचारवंतांनी स्थापन केलेली ही संस्था आजवर हजारो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावत आहे. तसेच हि संस्थान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या वचनबद्धतेसह, DES ही संस्था ज्ञानाचा प्रकाशपुंज बनली असून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि नैतिक घडणीत सातत्याने योगदान देत आहे. या संस्थेत नोकरी मिळेल हि अनेक उमेदवारांची इच्छा असते.
- पदाचे नाव – संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल
- पदसंख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सांगली
- अर्ज पद्धती – ऑफलाईन अर्ज करू शकता.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सांगली प्रादेशिक कार्यालय, विलिंग्डन कॉलेज पोस्ट ऑफिस, विश्रामबाग, सांगली – ४१६ ४१५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 दिवस (29 मे 2025)
- अधिकृत वेबसाईट – https://despune.org/
या भरती साठी अर्ज करण्यासाठी, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व सेवा अटी या संबंधीचे सर्व निकष नियामक संस्था, महाराष्ट्र शासन आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी वेळोवेळी निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राहतील. संचालक पदावर नियुक्ती ही नियुक्तीच्या तारखेपासून ५ वर्षांसाठी अथवा संबंधित उमेदवाराच्या निवृत्तीवयाच्या अट पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत मर्यादित असेल.
तसेच मित्रांनो, अर्ज काळ्जीपूर्ण पूर्ण भरावेत, कारण अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. www.despune.org या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत सर्व आवश्यक तपशीलांसह अर्ज सादर करावा.