सेंट्रल बँकेत ऑफिस असिस्टंट, वॉचमन, माळी पदांची भरती सुरु,७ वी पास, पदवीधर उमेदवारांना बँकेत नोकरीची संधी

Central Bank Job Vacancies


Central Bank Job Vacancies

सेंट्रल बँक ऑफ इंडिया हि भारतातील एक नावाजलेली बँक आहे. या बँकेत नोकरी मिळणं हे अणे उमेदवाराचं स्वप्न असत. परंतु बँकेतची नोकरी म्हणजे लांब प्रवेश प्रक्रिया असं चित्र आहे. परंतु, सेंट्रल बँक, प्रादेशिक कार्यालय, नाशिक यांनी प्रकाशित केलेल्या जाहिराती नुसार  येथे कंत्राटी पद्धतीने “ऑफिस असिस्टंट, वॉचमन कममाळी” या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क नाही आहे. तसेच, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० मे २०२५ आहे. तास बघितला तर हि भरती जरी कंत्राटी असली तरी एक नावाजलेल्या बँकेत नोकरीची संधी मिळत आहे. यात पदवीधर उमेदवार ऑफिस असिस्टंटसाठी अर्ज करू शकतात, तर ७ वी पास उमेदवार माळी, वाचमन या पदांसाठी अर्ज करू शकतात. चला तर अर्ज प्रक्रिया आणि अन्य माहिती बघूया.  आणि हो सर्व अपडेट्ससाठी रोजगारसंधीच्या व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन व्हायला विसरू नका, म्हणजे आम्ही तुम्हाला सर्व महत्वाचे जॉब्स अपडेट्स सोप्या भाषेत आणि अचूक माहिती सोबत देत राहू! 

भरतीची संक्षिप्त माहिती 

  • पदाचे नाव –  ऑफिस असिस्टंट, वॉचमन कम माळी
  • शैक्षणिक पात्रता – PDF जाहिरात वाचावी
    • ऑफिस असिस्टंट – पदवीधर 
    • वॉचमन कम माळी – ७ वी 
  • नोकरी ठिकाण –  नाशिक
  • वयोमर्यादा –22 – 40 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  क्षेत्रीय प्रमुख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, पी-६३, ग्लेनमार्क कंपनीजवळ, एमआयडीसी सातपूर नाशिक-४२२००७.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ३० मे २०२५.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/

या भरतीची निवड प्रक्रिया एकदम साधी आहे, पात्र उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि या संदर्भात सोसायटी/ट्रस्टचा निर्णय अंतिम असेल. म्हणजे मुलाखती नंतर सरळ नोकरी.

तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

वेतनमान किती असणार आहे?

मित्रांनो, जस कि हि भरती ऑफिस असिस्टंट, वॉचमन कम माळी या पदांसाठी होत आहे. या पदांचा पगार किती असेल ते जाणून घेऊया.

  • कार्यालय सहाय्यकासाठी: दरमहा रु.१२०००/- निश्चित केली जाईल. इतर कोणताही भत्ता/लाभ/देयके/सुविधा स्वीकार्य असणार नाही.
  • वॉचमन कम गार्डनरसाठी: दरमहा रु.६०००/- निश्चित केली जाईल. इतर कोणताही भत्ता/लाभ/देयके/सुविधा स्वीकार्य असणार नाही.

Central Bank Bharti Details

 

या पदासाठी अर्ज करताना, अर्जदाराने खात्री करावी की तो/ती वर नमूद केलेल्या पात्रता निकष आणि इतर निकष पूर्ण करतो आणि दिलेली माहिती सर्व बाबतीत बरोबर आहे. जर भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकष पूर्ण करत नाही आणि/किंवा त्याने/तिने कोणतीही चुकीची/खोटी माहिती दिली आहे किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, तर त्याची/तिची उमेदवारी आपोआप रद्द होईल. नियुक्तीनंतरही वरीलपैकी कोणतीही कमतरता आढळल्यास, त्याची/तिची करारबद्धता कोणत्याही सूचनाशिवाय रद्द केली जाऊ शकते हे उमेदवाराने लक्षात ठेवावे.

या भरतीची पूर्ण माहिती आणि अर्जाचा नमुन्याची लिंक आम्ही खाली देत आहोत. खालील लिंक वरून PDF फाईन डाउनलोड करावी, त्यातील पूर्ण माहिती काळजी पूर्वक वाचून मगच अर्ज करावा. हि जाहिरात आपण सेन्ट्रल बँकेच्या अधिकृत वेबसाईट www.centralbankofindia.co.in येथे सुद्धा बघू शकता.

5 Comments
  1. Kavita kakade says

    Aapli shakha Sambhajinagar district madhe aajun kuthe nahika

  2. Kavita kakade says

    Nashik sodun aajun kuthe aahe shakha

  3. Shital khade says

    My education is BSC computer so… Can I apply for this centre bank of india job

  4. Vishnu Gajanan Metkar says

    Payment kiti rahnar aahe

    1. RojgarSandhi says

      पदानुसार आहे, जाहिरात बघा त्यात पूर्ण माहिती दिलेली आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.