भुसावळच्या बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये शानदार नोकरीची संधी!

Bhusawal biyani military school vacancies


Bhusawal Biyani Military School Jobs – जर आपण दहावी, बारावी ते पदवीधर आहात तर हि भारी प्रक्रिया आपल्यासाठी आहे!  आपल्याला सरळ मिलटरी स्कुल मध्ये नोकरी मिळू शकते!  बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ येथे विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही भरती दहावी, बारावी ते पदवीधरांपर्यंत शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. विविध शैक्षणिक व सेवाभावी पदांसाठी ही संधी आहे. हि भरती सरळ मुलाखत द्वारे निवड प्रक्रिया आहे. म्हणजे एकदम सोपी! सरक नोकरीच! चला तर पूर्ण माहीत बघूया!

Bhusawal biyani military school vacancies

कोणकोणती पदे भरली जाणार?
या भरती अंतर्गत खालील पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे: या अंतर्गत खाली दिलेली विविध पदे भरण्यात येणार आहेत.
प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, संगणक शिक्षक, क्रीडा शिक्षक, संगीत व नृत्य शिक्षक, कमांडंट, डॉक्टर, लष्करी प्रशिक्षण प्रशिक्षक, गृहशिक्षक, वसतिगृह रेक्टर (मुले/मुली), अकाउंटंट, लिपिक, घरकाम करणारे कर्मचारी, वसतिगृहाचे सैनिक आणि सुरक्षा रक्षक.
या सर्व पदांसाठी पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक अर्हता
प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता व अनुभवाची अट भिन्न आहे. दहावी/बारावी उत्तीर्ण, पदवीधर, बी.एड., एम.एड., एम.एस्सी., पी.टी., एमबीबीएस, डी.फार्मा, सीए, डी.एड., संगीत नृत्य शिक्षण घेतलेले उमेदवार – यांच्यासाठी योग्य संधी उपलब्ध आहे. अधिकृत जाहिरात वाचून पात्रता तपासावी. या साठी अधिकृत जाहिरातीची लिंक आम्ही खाई दिलेली आहे. तरी आपण PDF जाहिरात काळजी पूर्वक वाचावी आणि हो अधिकृत वेबसाईट ची लिंक सुद्धा दिली आहे ती पण वेळोवेळी बघावी!

नोकरीचे ठिकाण आणि मुलाखतीचा पत्ता
ही भरती जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील बियाणी मिलिटरी स्कूल, जामनेर रोड येथे आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी थेट उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीच्या तारखा:
15, 16, 17 एप्रिल 2025

निवड प्रक्रिया – थेट मुलाखत!
या भरती प्रक्रियेमध्ये कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी सर्व मूळ कागदपत्रांसह आणि छायाप्रतीसह दिलेल्या तारखेला दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे.

बियाणी मिलिटरी स्कूल – एक शिस्तप्रिय शैक्षणिक संस्था
बियाणी मिलिटरी स्कूल ही शिस्त, गुणवत्ता आणि सेवा भावनेवर भर देणारी संस्था आहे. येथे काम करणं म्हणजे केवळ नोकरी नाही तर शिक्षण व संस्कार देण्याची जबाबदारी असल्याने संस्था विविध जबाबदार पदांसाठी सक्षम उमेदवारांची शोध घेत आहे.

सरकारी व खासगी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी उत्तम संधी
ही भरती खासगी स्वरूपाची असली तरी शैक्षणिक आणि सेवाभावी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. ग्रामीण भागातील उमेदवारांनीही या संधीचा लाभ घ्यावा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.